अल्पसंख्यांक मंत्रालय

भारतीय मुस्लीमांचे ‘ईज ऑफ डुईंग हज’ साठीचे स्वप्न सरकारकडून साकार- मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 17 FEB 2020 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2020

 

हज यात्रा प्रक्रिया भारतात 100 टक्के डिजिटल/ऑनलाईन करण्यामुळे भारतीय मुस्लिम समुदायाचे ‘ईज ऑफ डुईंग हज’ हे स्वप्न साकार झाल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत सांगितले. हज 2020 साठी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

हज यात्रेसाठीची प्रक्रिया 100 टक्के डिजिटल/ऑनलाईन केल्यामुळे मध्यस्थांचे काम राहिले नाही त्यामुळे गेल्या दशकांच्या तुलनेत हज यात्रा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहे. हज अनुदान मागे घेतल्यानंतरही यात्रेकरुंवर अतिरिक्त वित्तीय बोजा पडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण हज 2020 प्रक्रिया 100 टक्के डिजिटल करणारा, भारत हा जगातला पहिला देश ठरल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन अर्ज, ई-व्हिसा, हज मोबाईल ॲप, ई-मसिहा आरोग्य सुविधा, ई सामान प्री टॅगिंग याबाबत भारतातल्या हज यात्रेकरुंना माहिती देण्यात येत आहे. डिजिटल प्री टॅगिंग ही सुविधा या यात्रेकरुंना प्रथमच देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे भारतीय यात्रेकरुंना, सौदी अरेबियामधे पोहोचल्यानंतर वाहतूक आणि निवासाच्या व्यवस्थेविषयीची माहिती भारतातच मिळणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1603457) Visitor Counter : 165


Read this release in: English