आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

नोवेल कोरोना विषाणूला (कोविड-19) प्रतिबंध घालण्यासाठीच्या सज्जतेचा उच्चस्तरीय मंत्रिगटाकडून आढावा

Posted On: 13 FEB 2020 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2020

 

नोवेल कोरोना विषाणूसंदर्भात पंतप्रधानांच्या सूचनेनुसार स्थापन उच्चस्तरीय मंत्रिगटाची आज दुपारी दुसरी बैठक पार पडली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, नौवहन, रसायने आणि खत राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यावेळी उपस्थित होते.

कोविड-19 च्या सध्याच्या स्थितीबद्दल मंत्रिगटासमोर एक सादरीकरण करण्यात आहे. केरळमधे लागण झालेल्या तिघांच्या सद्य परिस्थितीबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

आजपर्यंत उपलब्ध माहितीनुसार 2,49,447 प्रवाशांसह 2,315 विमानांची चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले 15,991 लोक देखरेखीखाली आहेत. 1,671 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था निदान समन्वय प्रमुख केंद्र असून, नमूने तपासणीसाठी 14 क्षेत्रीय प्रयोगशाळा सक्रिय करण्यात आल्या आहेत.

एन 95 मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सचिव परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत असून 24*7 नियंत्रण कक्ष (011-23978047) कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

S.Pophale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1603126) Visitor Counter : 195


Read this release in: English