मंत्रिमंडळ

शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलँड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 FEB 2020 5:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलँड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. उभय देशांमध्ये हा करार दि.10 सप्टेंबर, 2019 रोजी झाला होता.

कराराची ठळक वैशिष्ट्ये -

अ.  खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध सुविधा निर्माण करणे.

ब. आधुनिक मत्स्यपालन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायातील लोकांना प्रशिक्षणा देण्याची व्यवस्था करणे.

क. मत्स्यपालन क्षेत्रातल्या शास्त्रीय शिक्षण आणि संशोधनाने मिळालेली माहिती आणि इतर सूचनांचे आदान-प्रदान करणे.

ड. उद्योग म्हणून विकास करण्यासाठी खोल समुद्रातून मिळणा-या मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करणे आणि त्यांचे विपणन करणे यासाठी असलेल्या शक्यतांचा तपास करणे. यासाठी तज्ञ आणि या क्षेत्रातले विशेषज्ञ यांची देवाण-घेवाण करणे.

या सामंजस्य करारामुळे भारत आणि आइसलँड यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील आणि मत्स्यपालन क्षेत्राबरोबरच व्दिपक्षीय चर्चेसाठी असलेल्या विषयांबाबत परस्परांमध्ये सहयोग वाढीस लागणार आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1602973) Visitor Counter : 167


Read this release in: English