आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लोकसंख्या दर

Posted On: 11 FEB 2020 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2020

 

जागतिक लोकसंख्या अहवाल 2019 नुसार वर्ष 2027 च्या सुमाराला भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

जनगणना 2011 नुसार देशाचा दशकीय वृद्धी दर 17.7 टक्के होता. महाराष्ट्रातला दशकीय वृद्धी दर 16 टक्के होता. एकूण प्रजनन दर कमी होऊन 2017 मध्ये तो 2.2 वर आला आहे. 2005 मध्ये तो 2.9 होता. किशोरवयीन जन्मदर निम्म्याने कमी होऊन 8 टक्क्यांवर आला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1602829) Visitor Counter : 521


Read this release in: English