अवजड उद्योग मंत्रालय

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2018-19 संसदेत सादर

Posted On: 10 FEB 2020 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020

 

सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2018-19 आज संसदेत सादर करण्यात आले. सर्वेक्षणानुसार 31 मार्च 2019 पर्यंत देशात 348 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असून 249 कार्यान्वित आहेत.

31 मार्च 2019 नुसार सार्वजनिक उपक्रमातील वित्तीय गुंतवणूक 16,40,628 कोटी रुपये असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 14.65 टक्के वृद्धी आहे.

सर्व कार्यान्वित सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील सकल महसूल 2018-19 मध्ये 25,43,370 कोटी रुपये राहिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 18.03 टक्के वृद्धी झाली आहे.

नफ्यातील 178 उपक्रमांचा नफा 2018-19 मध्ये 1,74,587 कोटी रुपये राहिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 11.96 टक्के वाढ झाली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 



(Release ID: 1602707) Visitor Counter : 185


Read this release in: English