संरक्षण मंत्रालय

रोसोबोरोनएक्सपोर्ट रशियाबरोबर डीआरडीओने केला तंत्रज्ञान विकास करार

Posted On: 07 FEB 2020 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2020

 

हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) ही डीआरडीओची प्रयोगशाळा उपग्रह रॉकेट आणि बंदूकांसाठी आवश्यक उच्च ऊर्जा सामुग्री विकसित करते.

संरक्षण प्रदर्शनादरम्यान पुणे स्थित एचईएमआरएलने रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्ट बरोबर प्रगत पायरो टेक्निक इग्नीशन प्रणालीच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकास करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे एनर्जेटीक आणि पायरो टेक्निक तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान प्राप्त होऊन प्रगत इग्नीशन प्रणालीचा विकास करता येईल, असे एचईएमआरएलचे संचालक के.पी.एस.मुर्ती म्हणाले. यामुळे भविष्यातील गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. या तंत्रज्ञान विकासामुळे अत्याधुनिक सॉलिड रॉकेट मोटर्सची संरचना आणि विकास करता येईल. ही उत्पादने कॉम्पॅक्ट आणि ऊर्जा कार्यक्षम प्रॉप्लशन प्रणालीवर आधारीत असते.

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1602416) Visitor Counter : 98


Read this release in: English