संरक्षण मंत्रालय
रशियाच्या मूळ उत्पादक कंपन्या आणि भारतीय कंपन्यांदरम्यान 14 सामंजस्य करार
Posted On:
06 FEB 2020 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020
भारत-रशिया लष्कर औद्योगिक परिषदेची पाचवी फेरी आज लखनौ येथे संरक्षण प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली. भारताकडून संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी तर रशियाकडून उद्योग आणि व्यापार उपमंत्र्यांनी सहअध्यक्षपद भूषवले.
भारतीय आणि रशियन कंपन्यांदरम्यान सहकार्याला गती देण्यासाठी भारताने अनेक उपाययोजना केल्या. मूळ रशियन बनावटीच्या उपकरणांचे सुटे भाग भारतात तयार करण्याबाबतचा करार 4 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आल्याचे डॉ. अजय कुमार म्हणाले.
या परिषदेदरम्यान रशियाच्या मूळ उत्पादक कंपन्या आणि भारतीय कंपन्यांदरम्यान 14 सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1602317)
Visitor Counter : 222