आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वुहान येथून भारतात परतलेल्या सर्व 645 लोकांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही, कोरोना विषाणूबाधित नवीन रुग्ण आढळला नाही
प्रविष्टि तिथि:
06 FEB 2020 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020
6 फेब्रुवारीपर्यंत 1265 उड्डाणांमधून आलेल्या 138750 प्रवाशांची कोरोना विषाणू संदर्भात तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
चीनमधल्या वुहान इथून सुटका करण्यात आलेल्या सर्व 645 जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली नसल्याचे प्रयोगशाळेतील चाचणीत निष्पन्न झाले आहे. संयुक्त देखरेख गटाची चौथी बैठक आज पार पडली.
आरोग्याविषयी अधिक चौकशीसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या +91-11-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा ncov2019[at]gmail[dot]com या ईमेलवर 24×7 संपर्क करता येईल.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1602312)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English