संरक्षण मंत्रालय

भारताच्या प्राधान्य देशांमध्ये आफ्रिका अव्वल स्थानी- संरक्षण मंत्री

Posted On: 06 FEB 2020 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020

 

आफ्रिकन देशांबरोबर संरक्षण संबंध नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भारत सज्ज असल्याचे संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिले. लखनौ इथे संरक्षण प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारत-आफ्रिका संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. भारत यापुढेही संबंध अधिक वृद्धिंगत करत राहिल, आफ्रिकेच्या प्राधान्य क्रमानुसार ही भागिदारी असेल, असे संरक्षण मंत्री म्हणाले.

आफ्रिकेबरोबर आमची भागिदारी ही खुली भागिदारी असेल आणि यामध्ये आमच्याकडून सहकार्यासाठी सर्व शक्यता आणि संधींची निवड करण्याची मुभा तुम्हाला राहिल, यावर त्यांनी भर दिला. भारत- आफ्रिका प्रांतात निल अर्थ व्यवस्थेच्या विकासासाठी सुरक्षित सागरी क्षेत्र ही पूर्व अट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या परिषदेत संरक्षण सहकार्याबाबत भारत-आफ्रिका घोषणापत्र स्वीकारण्यात आले.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल करमवीर सिंग, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल आर.के.एस.भदौरीया, लष्कर प्रमुख जनरल एम.एम.नरवणे, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, तसेच संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1602307) Visitor Counter : 272


Read this release in: English