पोलाद मंत्रालय

भारत जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक

Posted On: 05 FEB 2020 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2020

 

जागतिक पोलाद संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा क्रुड स्टील उत्पादक ठरला आहे. 2018 आणि 2019 मध्ये चीन नंतर भारताने क्रमांक पटकावला असून, जपानला मागे टाकत भारताने हे स्थान प्राप्त केले आहे.

2018 मधे भारताचे क्रुड स्टील उत्पादन 109.3 मेट्रिक टन होते. 2017 मधल्या 101.5 मेट्रीक टन उत्पादनाच्या तुलनेत यात 7.7 टक्के वाढ झाली. केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

S.Tupe/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1602120) Visitor Counter : 230


Read this release in: English