आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वेलनेस सेंटर

Posted On: 04 FEB 2020 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2020

 

आयुष्मान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर अंतर्गत दीड लाख उपआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डिसेंबर 2022 पर्यंत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यात येत आहे.

2018-19 या वित्तीय वर्षापर्यंत 40,000 हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरना परवानगी द्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 62,000 पेक्षा जास्त मंजूऱ्या देण्यात आल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यासह ही केंद्रे बळकट करण्यासाठी तंत्रविषयक आणि वित्तीय सहाय्यता पुरवली जाते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

 

R.Tidke/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1601929) Visitor Counter : 158
Read this release in: English