उपराष्ट्रपती कार्यालय
भारत आपल्या अंतर्गत बाबीत बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही- उपराष्ट्रपती
Posted On:
03 FEB 2020 12:46PM by PIB Mumbai
भारत आपल्या अंतर्गत बाबीत बाह्य हस्तक्षेप स्वीकारणार नाही असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे. ते आज नवी दिल्लीत एक कार्यक्रमात बोलत होते.
जम्मू काश्मीरच्या वेगवान विकासासाठी, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही, दहशतवादाचा धर्माशी संबंध जोडणे समस्याकारक असल्याचे ते म्हणाले.
जागतिक आर्थिक विकासाची गती मंदावलेली असतानाही भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या वेगवान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. याच गतीने सुधारणा सुरू राखल्यास भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
(Release ID: 1601772)