कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची उभारणी

Posted On: 03 FEB 2020 3:48PM by PIB Mumbai

देशात,प्रत्येक जिल्ह्यात  कौशल्य प्रशिक्षणासाठी, सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्वावर, आदर्श आणि आकांक्षी कौशल्य केंद्रे,म्हणजे प्रधानमंत्री कौशल केंद्र उभारण्यासाठी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय प्रोत्साहन देत आहे.

असे प्रत्येक कौशल्य केंद्र उभारण्यासाठी, मंत्रालय,प्रकल्प गुंतवणुकीच्या 75% भांडवली खर्च पुरवते. 17 जानेवारी 2020 पर्यंत प्रधान मंत्री कौशल केंद्राद्वारे देशभरात 11.13 लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर के सिंग यांनी आज लोकसभेत एक लेखी उत्तरात दिली.याच तारखेपर्यंत, देशातल्या 707 जिल्ह्यात 812 अशी केंद्रे मंजूर करण्यात आली,त्यापैकी 723 केंद्रे उभारण्यात आली.

***


(Release ID: 1601770) Visitor Counter : 121
Read this release in: English , Bengali