आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोरोना विषाणू संदर्भात कॅबिनेट सचिवांनी घेतली आढावा बैठक

Posted On: 01 FEB 2020 7:33PM by PIB Mumbai

कोरोना विषाणू संदर्भातल्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी नवी दिल्लीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांसह परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक, या खात्यांच्या सचिवांसमवेत बैठक घेतली. भारत तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय आपत्त्ती व्यवस्थापन यांचे  प्रतिनिधीही  बैठकीला उपस्थित होते. कॅबिनेट सचिवांनी आतापर्यन्त यासंदर्भात सहा बैठका  घेतल्या आहेत.

चीन संदर्भात प्रवासविषयक सुधारित सूचना जारी करण्यात आल्या असून चीनला प्रवास  करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ जानेवारीपासून आतापर्यंत चीनमधून परतलेल्या प्रवाश्याना वेगळ्या  कक्षात  ठेवले जाऊ शकते.

आतापर्यंत ५८,६५८ प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या १४२ प्रवाश्याना वेगळ्या देखरेख   कक्षात ठेवण्यात आले आहे. १३० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२८ निगेटिव्ह आढळले आहेत. केरळमध्ये पॉझिटिव्ह नमुने आढळलेल्या दोन जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे३३० प्रवाश्यांची दुसरी तुकडी वुहान हुन भारतात परतली आहे, यामध्ये मालदीवच्या सात प्रवाश्यांचा समावेश आहे. ३०० जणांना आय टी बी पी चावला कॅम्प मध्ये तर ३० जणांना मानेसरमध्ये ठेवण्यात आले आहे.

***

B.Gokhale/ N.Chitale


(Release ID: 1601747) Visitor Counter : 160


Read this release in: English , Hindi , Bengali