आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणू संदर्भात प्रवासविषयक सुधारित सूचना जारी
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2020 4:18PM by PIB Mumbai
कोरोना विषाणू संदर्भात प्रवासविषयक सुधारित सूचना जारी करण्यात आल्या असून चीनला प्रवास करणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. १५ जानेवारीपासून आतापर्यंत चीनमधून परतलेल्या प्रवाश्याना वेगळ्या कक्षात ठेवले जाऊ शकते.
चीनी पारपत्र धारकांसाठी ई व्हिसा सुविधेला तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
आधीच ई व्हिसा जारी करण्यात आला असून अशा प्रवाशांचा हा व्हिसा तात्पुरत्या काळासाठी वैध राहणार नाही.
चीनमधून भारतात परतणे ज्यांना भाग आहे अशा प्रवाश्यानी बीजिंग मधल्या, शांघाय अथवा गुआनझाओ इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असे यात नमूद करण्यात आले आहे.
***
B.Gokhale/ N.Chitale
(रिलीज़ आईडी: 1601724)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English