अर्थ मंत्रालय

नवी व्यक्तिगत आयकर रचना करदात्मयांना विशेषतः मध्यमवर्गीयांना भरघोस दिलासा देणारी

Posted On: 01 FEB 2020 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2020

 

व्यक्तीगत करदात्यांना भरघोस सवलत मिळावी आणि आयकर कायद्याच्या तरतुदी सोप्या व्हाव्यात म्हणून अर्थसंकल्पात एका नव्या आणि सोप्या आयकर प्रणालीचा प्रस्ताव केला आहे. नव्या पध्दतीने आयकर भरणे हा एक पर्याय ठेवला गेला आहे. पर्याय स्विकारणाऱ्यांना आयकरातील सवलती आणि वजावटी सोडाव्या लागतील.

अंदाजपत्रक मांडताना अर्थ मंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की ज्यांना सध्याच्या व्यवस्थेत अधिक सवलती मिळतात ते जुनी पद्धत स्विकारु शकतात.

नव्या वैयक्तिक आयकरात खालील पध्दतीने कर आखला जाईल:

करपात्र उत्पन्न (रुपयात)

सध्याचे आयकर दर

नवे आयकर दर

0-2.5 लाख

--

--

2.5-5 लाख

5%

5%

5-7.5 लाख

20%

10%

7.5-10 लाख

20%

15%

10-12.5 लाख

30%

20%

12.5-15 लाख

30%

25%

15 लाखापेक्षा अधिक

30%

30%

 

सवलती आणि वजावटी   घेणाऱ्यांना त्याच्या यात मोठ्या आयकर सवलती मिळु शकतात.

उदाहरणार्थ एखादी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 15 लक्ष रुपये असेल तर आणि ती कोणत्याही सवलती घेत नसेल तर ती 2,73,000 रुपयांच्या ऐवजी केवळ 1,95,000 रुपये आयकर भरेल.  अशारीतीने तिचा करभरणा 78,000 रुपयांनी कमी असेल. परंतु विविध वजावटी आणि सवलतींमुळे जुन्या पद्धतीत तिचे करनिर्धारण 1,50,000 रुपयांनी कमी होत असेल तर जुनीच पध्दत स्विकारणे तिच्या फायद्याचे ठरते. 

नवीन वैयक्तिक आयकर दरांमुळे 40,000 कोटी रुपयांची करतूट सरकारला दरवर्षी सहन करावी लागणार आहे.

कर परतावे भरण्याची पद्धत सोपी केली असल्याने करदात्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागणार नाही.

नव्या आयकर रचनेमुळे एकीकडे आयकराच्या बोजा कमी होत असतानाच 70 सवलती आणि 100 हून अधिक वजावटी रद्द होतील. उरलेल्या सवलती टप्प्याटप्प्याने केलेल्या जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.     

 

G.Chippalkatti/S.Patil/D.Rane

 



(Release ID: 1601560) Visitor Counter : 112


Read this release in: English