अर्थ मंत्रालय

जानेवारी 2020 मध्ये 1,10,828 कोटी रुपये जीएसटी सकल महसूल संकलित


जीएसटी लागू झाल्यानंतर जानेवारी 2020 दुसरे सर्वाधिक मासिक संकलन

Posted On: 01 FEB 2020 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2020

 

जानेवारी, 2020 मध्ये जमा झालेला एकूण जीएसटी महसूल 1,10,828 कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी 20,944 कोटी रुपये हे, एसजीएसटी 28,224 कोटी रुपये आहे, आयजीएसटी 53,013 कोटी रुपये आहे (आयातीवर 23,481 कोटी रुपये संकलनासह ) आणि सेस 8,637 कोटी रुपये (आयातीवर 824 कोटी रुपयांसह ). 31 जानेवारी, 2020 पर्यंत डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर 3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या 83 लाख (अंदाजे) आहे.

सरकारने सीजीएसटीला 24,730 कोटी आणि आयजीएसटी कडून एसजीएसटीला  18,199 कोटी रुपये दिले आहेत. जानेवारी, 2020 मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कमावलेला महसूल सीजीएसटीसाठी 45,674 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 46,433 कोटी रुपये इतका आहे.

जानेवारी 2019 च्या तुलनेत जानेवारी 2020 मध्ये देशांतर्गत व्यवहारांमध्ये 12 टक्के लक्षणीय वाढ झाली आहे. वस्तूंच्या आयातीद्वारे संकलित महसूल लक्षात घेतला तर एकूण महसूल 8 टक्के अधिक आहे. जानेवारी 2020 मध्ये आयातीवरील आयजीएसटीने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा मासिक महसूल 1.1 लाख कोटी आहे आणि वर्षभरात सहाव्यांदा एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

B.Gokhale/S.Kane /P.Malandkar


(Release ID: 1601548) Visitor Counter : 232


Read this release in: English