अर्थ मंत्रालय

जनतेला पोषण आणि वीज उपलब्धतेमुळे जीडीपी मध्ये वृद्धी- आर्थिक सर्वेक्षण  2019-20


सेवा क्षेत्राने उत्पादन, पायाभूत संरचना आणि कृषी क्षेत्राला टाकले मागे

Posted On: 31 JAN 2020 6:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2020

 

पोषण आणि वीज लोकांना उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा उच्च वृद्धी दर आणि उत्पादन, पायाभूत संरचना आणि कृषी क्षेत्र यांच्याहून अधिक नव्या कंपन्या सेवा क्षेत्रात निर्माण झाल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2019- 20 मधे नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणूकदार आणि धोरण निर्मात्यांना निर्णय घेण्यासाठी जीडीपी वृद्धी महत्वाचा पैलू असलयाचे सर्वेक्षणात म्हटले आहे. 2011 मध्ये अनुमान पद्धतीच्या आढाव्यानंतर, भारताच्या जीडीपीचे अनुमान योग्य आहे का यासंदर्भातली नुकतीच झालेली चर्चा या सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आली आहे. भारताची सध्याची जीडीपी वृद्धी,अनुमानित वृध्दीपेक्षा अधिक आहे का, यासाठी पुराव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून अर्थशास्त्रीय पद्धतींचा अभ्यास करण्यात आला असता भारताच्या जीडीपी विकासाबाबत कोणताही अयोग्य अंदाज असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही.

भारताच्या सांख्यिकी संरचनेत सुधारणेसाठी गुंतवणुकीच्या आवश्यकतेवर, सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे.भारताने अनेक सामाजिक विकास मापदंडात महत्वपुर्ण सुधारणा केल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

गुंतवणुकीला चालना देण्यासाठी,भारताने,थेट परकीय गुंतवणुकीचे निकष शिथिल करणे,कंपनी कर कमी करणे, भाववाढ नियंत्रणात ठेवणे,पायाभूत संरचना निर्मितीला गती देणे, व्यवसाय सुलभता आणि कर रचनेत सुधारणा यासारखी अनेक पावले उचलली असल्याची नोंद सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.

भारतात औपचारिक क्षेत्रात 504 जिल्ह्यात नव्या कंपन्यांची निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे, त्याबाबत सर्वेक्षणात चर्चा करण्यात आली असून नव्या कंपन्यांच्या निर्मितीत 10 टक्के वाढ झाल्याने जिल्हा स्तरावर जीडीपी मध्ये 108 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1601345) Visitor Counter : 115


Read this release in: English