अर्थ मंत्रालय

2011-12 आणि 2017-18 दरम्यान नियमित वेतन/पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण आणि शहरी भागांत 2.62 कोटी नवीन रोजगारनिर्मिती

Posted On: 31 JAN 2020 5:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2020

 

रोजगारनिर्मिती, रोजगार सुधारणा ही सरकारची प्राथमिक क्षेत्रे असून सरकारने यादिशेने कमालीची प्रगती केली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये ही एक महत्वाची नोंद आहे. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), ही सरकारच्या कौशल्य भारत अभियानाचा एक प्रमुख भाग आहे, यामुळे युवकांना लघु कालावधी प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (2016-20), अंतर्गत 11 नोव्हेंबर 2019 पर्यंत 69.03 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचा तपशील सर्वेक्षणात आहे.

अतिरिक्त रोजगारनिर्मितीवर भर देण्याबरोबरच, रोजगाराचा दर्जा आणि अर्थव्यवस्थेचे औपचारिकरण यावर विशेष भर दिल्याची नोंद आर्थिक सर्वेक्षणात आहे. नियमित वेतन/पगारदार कर्मचाऱ्यांचा हिसा पाच टक्क्यांनी वाढून 2011-12 मध्ये 18 टक्के होता तो  2017-18 मध्ये 23 टक्के झाला. एकंदरीत नवीन रोजगारनिर्मितीत 2.62 कोटींची वाढ झाली, यात 1.21 कोटी ग्रामीण भागात आणि 1.39 कोटी शहरी भागात रोजगारनिर्मिती झाली.

  

B.Gokhale/S.Thakur/P.Kor


(Release ID: 1601333) अभ्यागत कक्ष : 153
Read this releasein: English