रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे स्वयंचालित ओळख आणि माहिती संकलन तंत्रज्ञानाचा मालवाहतुकीसाठी वापर करणार

Posted On: 30 JAN 2020 6:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2020

 

भारतीय रेल्वे ही देशातील प्रवासी आणि मालवाहतूक गरजा भागविणारी जगातील व्यापक रेल्वेयंत्रणेपैकी यंत्रणा आहे. ती  दोन कोटी तीस लाख प्रवासी आणि ६५ हजार मार्गांवरून ३० लाख टन वाहतूक दररोज करते.

देशभरात वाहतूक होत रहाणाऱ्या या मालाच्या सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी स्वयंचालित प्रणालीने त्याची देखरेख करण्याचे RFID या प्रकल्पाद्वारे ठरविण्यात आले आहे. अशा दोन प्रकल्पांसाठी ११२.९६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

यासाठी CRIS ही भारतीय रेल्वे ची माहिती प्रणाली GS India आणि उद्योग पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया योजनेद्वारे एकत्र येत आहेत.

या प्रकल्पानुसार रेल्वेच्या मालडब्यांवर (वाघिणींवर) समकालिक लक्ष ठेवले जाणार आहे.

कमी क्षमतेची इंटरनेट जोडणी असलेल्या क्षेत्रातही ही देखरेख यंत्रणा वापरली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक जुळवाजुळव रेल्वेने केली आहे. रेडिओ लहरींचा वापर करून RFID टॅगद्वारे इलेक्ट्रॉनिक माहिती प्रणाली उभारली जात आहे.

रेल्वेने यासाठी ३लक्ष ५०हजार वाहक बोगींवर टॅग लावण्याचे लक्ष ठेवले आहे. ते २०२१ पर्यंत पूर्ण करायचे आहे.

 

B.Gokhale/G.Chippalkatti/P.Kor



(Release ID: 1601163) Visitor Counter : 85


Read this release in: English