आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
चीनहून परत येणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना
Posted On:
30 JAN 2020 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2020
तुमचे आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तुम्ही हे जाणून घ्यायला हवे
चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाला असून अन्य देशांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना रोगाची लक्षणं सर्दी तसेच श्वसनाशी संबंधित आजार अशी आहेत.
याची लक्षण कोणती?
ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास अशी याची साधारणपणे लक्षणे आहेत.
आजारी पडण्यापासून तुमचे आणि इतरांचे रक्षण कसे कराल?
तुम्ही जर नुकतेच चीनहून (गेल्या 14 दिवसात) परत आला असाल किंवा कोरोना विषाणूबाधित व्यक्तींशी तुमचा संपर्क झाला असेल तर घ्यायची काळजी पुढीलप्रमाणे:-
- तुम्ही परतल्यानंतर घरातच स्वतंत्रपणे 14 दिवस वेगळे राहा.
- स्वतंत्र खोलीत झोपा
- कुटुंबातील अन्य सदस्यांशी संपर्क टाळा तसेच पाहुण्यांनाही भेटू नका
- खोकतांना आणि शिंकतांना नाक आणि तोंड झाकून घ्या
- सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या कुणाचाही संपर्क टाळा (त्या व्यक्तीपासून किमान 1 मीटरचे अंतर ठेवा)
घरातल्या प्रत्येकाने दरवेळी हात स्वच्छ धुवावेत
- शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर
- आजारी व्यक्तीची काळजी घेत असतांना
- तुम्ही जेवण बनवण्यापूर्वी आणि जेवण बनवल्यानंतर
- जेवणापूर्वी
- शौचालयाचा वापर केल्यानंतर
- हात खराब झाले असतील तेव्हा
- प्राणी किंवा प्राण्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्यानंतर
चीनहून परत आल्यानंतर 28 दिवसांमध्ये कधीही ताप, खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवत असेल तर
- आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधा. + 91-11-23978046.
- त्वरित मास्क परिधान करा आणि जवळच्या वैद्यकीय सुविधेशी संपर्क साधा.
- घाबरू नका
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1601160)