आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणूबाबत ताजी माहिती : केरळमध्ये एक रूग्ण आढळला
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2020 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2020
कोरोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण केरळमध्ये आढळला असून चीनमधल्या बुहान विद्यापीठात तो शिकत होता. त्याची तपासणी केली असता त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले असून रुग्णालयात स्वतंत्र कक्षात त्याला ठेवण्यात आले आहे.
त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1601151)
आगंतुक पटल : 362
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English