पंतप्रधान कार्यालय

शहीद दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 30 JAN 2020 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहीद दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राजघाट येथे महात्मा गांधींना पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मी वंदन करतो. महात्मा गांधींचे व्यक्तीमत्व, त्यांचे विचार आणि आदर्श आपल्याला मजबूत, सक्षम आणि समृद्ध नवीन भारताच्या उभारणीसाठी यापुढेही प्रेरित करत राहतील.’

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 


(Release ID: 1601149) अभ्यागत कक्ष : 223
Read this releasein: English