मंत्रिमंडळ

मागास भाग, समाजातला वंचित वर्ग आणि नव्यानं पुढे येणाऱ्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नव्या प्रकल्पांसाठी एन ई सी च्या तरतुदीपैकी 30 टक्के तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 29 JAN 2020 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खालील बाबींना मंजुरी देण्यात आली:-

ईशान्येकडच्या राज्यात, मागास भागांचा विकास,समाजातल्या वंचित घटकांचा विकास आणि नव्याने उदयाला येणाऱ्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नव्या प्रकल्पांसाठी, ईशान्य परिषदेच्या योजना या सध्याच्या योजनेअंतर्गत एन ई सी च्या तरतुदीपैकी 30 टक्के   तरतुदीला मंजुरी.

उर्वरित निधी दोन भागात विभागला जाईल.( राज्य 60% आणि केंद्र 40 %)

 मूल्यांकन आणि मंजुरीबाबतची यंत्रणा सुलभ व्हावी यासाठी एनईसीच्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेतला जाईल.

सध्याच्या एन ई सी च्या योजना या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांमुळे, ईशान्येकडच्या राज्यातल्या मागास आणि दुर्लक्षित भागातल्या लोकांचा सामाजिक-आर्थिक लाभ होणार आहे.यामुळे प्रकल्पांसाठी वेगवान निर्णय आणि प्रकल्पांची जलद अंमलबजावणी शक्य होणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1600958) Visitor Counter : 139


Read this release in: English