मंत्रिमंडळ

राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक,2019 मध्ये अधिकृत दुरूस्ती करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 29 JAN 2020 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक, 2019 मध्ये अधिकृत दुरूस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार होमिओपॅथी केंद्रीय परिषद (एचसीसी) अधिनियम, 1973 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या हे विधेयक राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे.

या विधेयकामध्ये सुधारणा केल्यामुळे:-

  • होमिओपॅथी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक नियामक सुधारणा करता येतील.
  • सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पारदर्शक व्यवहार आणि जबाबदारी निश्चित करता येईल. आयोगाच्यावतीने देशातल्या सर्व भागामध्ये परवडणाऱ्या दरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य होईल.

पृष्ठभूमी:-

होमिओपॅथी शिक्षण आणि प्रॅक्टिस करण्याचे नियम, केंद्रीय होमिओपॅथीचे नोंदपुस्तकं व्यवस्थित ठेवणे तसेच यासंबंधी सर्व प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी होमिओपॅथी परिषदेच्या निर्मितीसाठी होमिओपॅथी केंद्रीय परिषद अधिनियम, 1973 लागू करण्यात आले होते. भारतीय चिकित्सा परिषद अधिनियम, 1956 यांच्या आधारे होमिओपॅथीचे अधिनियम तयार करण्यात आले आहेत. परंतु होमिओपॅथी परिषदेला या नियमाअंतर्गत काम करणे सोईचे ठरत नाही, त्यामुळे आता नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1600950) Visitor Counter : 169


Read this release in: English