जलशक्ती मंत्रालय

प्रजासत्ताक दिन संचलन 2020 मध्ये जल जीवन अभियान चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट

Posted On: 28 JAN 2020 4:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2020

 

केंद्र सरकारचे जल जीवन अभियान ठळकपणे मांडणाऱ्या, जलशक्ती, मंत्रालयाच्या चित्ररथाला, एनडीआरएफच्या चित्ररथासमवेत सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा सन्मान मिळाला आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट या अभियानात ठेवण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत एका शानदार कार्यक्रमात जलजीवन अभियान चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार प्रदान केला. ‘हर धर जल’ हा पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी उद्दिष्ट मांडणारा हा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य आकर्षण ठरला होता.

गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी जल जीवन अभियानाच्या प्रारंभाची घोषणा केली होती.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1600809) अभ्यागत कक्ष : 169
Read this releasein: English