कृषी मंत्रालय
भाजीपाला-फळे-फुलांचा 2019-20 मधल्या उत्पादनाचा पहिला अग्रीम अंदाज
Posted On:
27 JAN 2020 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2020
देशातल्या भाजीपाला, फळे-फुले अशा फुलोत्पादक उत्पादनांचा वर्ष 2018-19 मधला सुधारित अंदाज आणि वर्ष 2019-20 मधला पहिला अग्रीम अंदाज आज केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागात जाहीर केला.
यानुसार, 2018-19 या वर्षात देशातील 25.43 दशलक्ष हेक्टर जमिनीवर 310.74 दशलक्ष टन इतकं उत्पादन झाले. 2019-20 या वर्षासाठीचा पहिला अग्रीम अंदाजही मंत्रालयाने जाहीर केला आहे. यंदा पिक क्षेत्रात वाढ होऊन ते 25.61 दशलक्ष हेक्टर इतके असेल तसेच उत्पादनातही 313.35 दशलक्ष टनपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2019-20 या वर्षात भाजीपाला, सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, फळे, फुले आणि मसाल्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. विशेषत: द्राक्षं, केळी, आंबे, संत्री-मोसंबी, पपई आणि डाळींबाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1600722)
Visitor Counter : 149