गृह मंत्रालय

141 पद्म पुरस्कार जाहीर

Posted On: 25 JAN 2020 10:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2020

 

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेले पद्म पुरसकार आज जाहीर करण्यात आले. यंदा 141 पद्म पुरस्कार दिले जाणार असून यात 7 पद्म विभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिले आहेत. मॉरिशसचे ए. जगन्नाथ यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

यंदा महाराष्ट्रातल्या 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मभूषण

आनंद महिंद्रा, उद्योगपती

 

पद्मश्री

  1. झहीर खान, क्रिकेटपटू
  2. पोपटराव पवार, समाजसेवक
  3. डॉ. रमण गंगाखेडकर, विज्ञान आणि अभियांत्रिकी
  4. करण जोहर, चित्रपट निर्माता
  5. सरिता जोशी, अभिनेत्री
  6. एकता कपूर, चित्रपट निर्माती
  7. राहिबाई पोपरे, कृषी
  8. कंकणा राणावत, अभिनेत्री
  9. अदनान सामी, गायक
  10. सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई, सामाजिक कार्य
  11. डॉ. सांद्र देसा सौजा,  वैद्यकीय
  12.  सुरेश वाडकर, गायक

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1600603) Visitor Counter : 392


Read this release in: English