गृह मंत्रालय

अग्नीशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रपती पदक पुरस्कार देऊन गौरव

Posted On: 25 JAN 2020 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2020

 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या, विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 104 कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 13 कर्मचाऱ्यांना, अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 29 कर्मचाऱ्यांना आणि राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक 12 कर्मचाऱ्यांना तसेच, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक 50 कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे.

होम गार्ड आणि नागरी संरक्षण पुरस्कारांसाठी यंदा 49 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी, राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण विशिष्ट सेवा पदक 2 कर्मचाऱ्यांना आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक 47 कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्रातील अग्नीशमन दल, होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे :-

  1. श्री प्रभाकर सूरजलाल रहांगदले –मुख्य अग्निशमन अधिकारी .
  2. श्री राजेंद्र अभयचंद्र चौधरी- उप अग्निशमन अधिकारी
  3. श्री रवींद्र नारायणराव आम्बुलगेकर- विभागीय अग्निशमन अधिकारी
  4. श्री मिलिंद नामदेव दोंदे- एडीएएफओ
  5. श्री अभिजित गंगाराम सावंत- स्टेशन अधिकारी
  6. श्री सुधीर रमेश वर्तक – ड्रायव्हर ऑपरेटर
  7. श्री दिलीप महादेव पालव- उपमुख्य अग्निशमन अधिकारी

 

 

 

S.Tupe/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1600539) Visitor Counter : 129


Read this release in: English