गृह मंत्रालय

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2020 6:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2020

 

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामाची दखल घेत केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार स्थापन केले आहेत. दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात. 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान या पुरस्कारांसाठी 330 नामांकने पत्र प्राप्त झाली होती. दोन उच्चस्तरीय समित्यांद्वारे या अर्जांची छाननी होऊन पुरस्कार निवडले जातात. यंदाच्या पुरस्कारासाठी उत्तराखंडमधील आपत्ती व्यवस्थापन केंद्र तसेच कुमार मुन्नान सिंग यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेसाठी प्रमाणपत्र आणि 51 लाख रुपये रोख तर व्यक्तीसाठी  प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1600371) आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English