पंतप्रधान कार्यालय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 23 JAN 2020 3:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले, ‘23 जानेवारी 1897 रोजी जानकीनाथ बोस यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले ‘मध्यान्हीला एका मुलाचा जन्म झाला’ हा मुलगा पुढे शूर स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत बनला ज्याने आपले संपूर्ण आयुष्य भारताचे स्वातंत्र्य या एका महान कार्यासाठी वेचले. मी नेताजी बोस यांच्याबद्दल बोलत आहे. यांच्या जयंतीदिनी आपण त्यांचे अभिमानाने स्मरण करत आहोत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य आणि वसाहतवाद रोखण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमिट योगदानासाठी भारत कायम त्यांचा ऋणी राहील. देशवासियांच्या प्रगती आणि कल्याणासाठी ते खंबीरपणे उभे राहिले’

On 23rd January 1897, Janakinath Bose wrote in his diary, “A son was born at midday.”

This son became a valorous freedom fighter and thinker who devoted his life towards one great cause- India’s freedom.

I refer to Netaji Bose, who we proudly remember on his Jayanti today. pic.twitter.com/wp3UjudKJ4

— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020

India will always remain grateful to Netaji Subhas Chandra Bose for his bravery and indelible contribution to resisting colonialism. He stood up for the progress and well-being of his fellow Indians. pic.twitter.com/otUlFanULs

— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020

M.Chopade/S.Kane/P.Kor



(Release ID: 1600308) Visitor Counter : 98


Read this release in: English