मंत्रिमंडळ
मतदार यादी व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भारत, ट्यूनिशिया आणि पापुआ न्यू गिनी या देशांमधल्या निवडणूक आयोगांमधल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
22 JAN 2020 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताच्या निवडणूक आयोगाला ट्यूनिशिया आणि पापुआ न्यू गिनी या देशांमधल्या निवडणूक आयोगांसोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मतदार यादी व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात हा करार होणे अपेक्षित आहे.
परिणाम
या करारामुळे ट्यूनिशिया आणि पापुआ न्यू गिनीमधल्या निवडणूक आयोगांना भारताकडून तांत्रिक सहकार्य आणि क्षमता बांधणीसाठी मदत मिळू शकेल. या दोन्ही देशांना सुव्यवस्थित निवडणुका घेण्यासाठी या कराराचा लाभ होईल. या करारामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांनाही बळकटी मिळेल.
पार्श्वभूमी
भारतीय निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीशी संबंधित मुद्यांवर जगातल्या काही राष्ट्रांसोबत सहकार्य करण्याला प्राधान्य देत आहे. या संदर्भात आयोग विविध देशांमधल्या निवडणूक आयोगांशी सामंजस्य करारही करत आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात यशस्वीपणे निवडणुका राबविण्याचे काम निवडणूक आयोग करत आहे. त्यामुळे या कार्यात भारतीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जगातल्या अनेक राजकीय व्यवस्था उत्सूक आहेत. या पार्श्वभूमीवर असा करार झाल्यास निवडणूक आयोग या देशाला सहकार्य आणि मार्गदर्शन करू शकेल.
S.Tupe/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1600167)
Visitor Counter : 175