नौवहन मंत्रालय

आर्थिक दरी भरुन काढण्यात नवतंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकते : एड्‌सवरील संयुक्त राष्ट्रांच्या गोलमेज परिषदेत मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन

Posted On: 21 JAN 2020 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

स्वित्झर्लंड इथल्या दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत आज एड्‌सवर संयुक्त राष्ट्रांनी उच्चस्तरीय गोलमेज परिषद आयोजित केली होती. नौवहन (स्वतंत्र कार्यभार) आणि रसायने व खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय या परिषदेत सहभागी झाले होते.

आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पाहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आणि आर्थिक दरी भरुन काढण्यासाठी नवतंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन मांडवीय यांनी केले.

सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने उचललेल्या पावलांबाबत त्यांनी माहिती दिली. यात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना या योजनांचा समावेश होता.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1600017) Visitor Counter : 152


Read this release in: English