पंतप्रधान कार्यालय

मेघालयाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

Posted On: 21 JAN 2020 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयाच्या नागरिकांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मेघालयाचे नागरिक दयाळू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. खेळ, संगीत, निसर्ग संवर्धन याबाबत त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आगामी काळात मेघालयाच्या विकासासाठी सदिच्छा व्यक्त करतो; असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 



(Release ID: 1599959) Visitor Counter : 69


Read this release in: English