उपराष्ट्रपती कार्यालय
अभिजात भाषांच्या जतन आणि प्रोत्साहनाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2020
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिजात भाषांचे जतन आणि प्रोत्साहनाचे आवाहन केले आहे. या भाषा म्हणजे आपल्या इतिहासाचा आणि प्राचीन भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचा झरोका आहेत असे ते म्हणाले.
नेल्लोर जिल्ह्यातल्या वेंकटचलम येथे तेलगू साहित्यिक, भाषा तज्ञ आणि साहित्यिकांशी त्यांनी आज संवाद साधला.
आपल्या अभिजात भाषा या आपल्या प्राचीन तत्ववेत्ते, कवी, महाकवी, विचारवंत यांच्या ज्ञानाचे आणि बुद्धीचे दर्शन घडवतात.
याचे जतन आपण केले नाही तर आपल्या लाभलेल्या मोलाच्या खजिन्याची किल्लीच आपण गमावून बसू असे त्यांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1599881)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English