संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांची एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबीर 2020 ला भेट
Posted On:
20 JAN 2020 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2020
नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनी आज करिअप्पा परेड मैदानावर एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबीर 2020 ला भेट दिली. छात्र सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली. छात्रसैनिकांनी केलेले सामाजिक जागृतीपर संकल्पनांचे दर्शन घडवणाऱ्या ‘फ्लॅग एरिया’ची नौदल प्रमुखांनी पाहणी केली. ‘हॉल ऑफ फेम’ चीही नौदल प्रमुखांनी पाहणी केली.
युवकांना प्रेरणा देणारी आणि सक्षम करणारी एनसीसी ही युवक संघटना असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. राष्ट्र उभारणीत आणि आपत्ती काळात एनसीसीच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1599863)
अभ्यागत कक्ष : 137