अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 च्या छपाई प्रक्रियेला हलवा कार्यक्रमाने सुरुवात

Posted On: 20 JAN 2020 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2020

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 च्या छपाई प्रक्रियेला हलवा कार्यक्रमाने आज सुरुवात झाली. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत दिल्लीत नॉर्थ ब्लॉकमधे आज सकाळी हा कार्यक्रम झाला.

येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 संसदेत मांडण्यात येणार आहे. नॉर्थ ब्लॉकमधे अर्थसंकल्पाची छपाई होते. अर्थसंकल्पाची गोपनीयता राखण्यासाठी, अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतले अधिकारी या काळात इथेच राहतात. याच्याशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आता वित्तमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच आपल्या आप्तांशी संपर्क साधू शकतील.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर, वित्त सचिव राजीव कुमार यांच्यासह वित्तमंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर वित्तमंत्र्यांनी छापखान्याचा फेरफटका मारुन अर्थसंकल्पाच्या छपाई प्रक्रियेबाबत जाणून घेतले.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1599839) Visitor Counter : 120


Read this release in: English