अर्थ मंत्रालय

सराफा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या करचुकवेगिरीचे रॅकेट मुंबई जीएसटी आयुक्तालयाकडून उघड

Posted On: 18 JAN 2020 8:40PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जानेवारी 2020

 

मुंबई जीएसटी आयुक्तालयाने सराफा व्यापाऱ्यांकडून होणारी कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी उघड केली आहे. अनोखी पद्धत वापरुन सराफा व्यापारी जीएसटी चुकवून सराफा मालाची वाहतूक करत होते.

मुंबईच्या सराफा व्यापाऱ्यांना हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणांहून काही व्यापारी सोने आणि सुवर्णालंकार तसेच मौल्यवान धातू जीएसटीशिवाय पाठवत असल्याची खबर मुंबई जीएसटी आयुक्तालयाला मिळाली. विविध विमान कंपन्यांच्या कुरीअर मधून अशी वाहतूक केली जात होती. मुंबई जीएसटीच्या तस्करी विरोधी विभागाने सांताक्रूज एअर कार्गो टर्मिनल येथील मेसर्स कोनकोर एअर लिमिटेडच्या कार्यालयावर धाड टाकली, धाडीतून सोने आणि चांदीचा माल मिळाला.

प्राथमिक चौकशीत आढळून आले की, सराफा व्यापाऱ्यांच्या नावाशिवाय माल एकत्रित करुन तीच व्यक्ती कुरीअर एजंट म्हणून काम करत असे. विमानकंपन्यांनाही तशीच माहिती दिली जात असे. यात सोन्याच्या पट्टया, सोन्याची हिरेजडीत दागिने, हिरे, माणिक आणि मोती यांचा समावेश आहे. 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान या सामानाची पडताळणी केली. यावेळी हे सामान कोणत्याही कर कागदपत्रांशिवाय असल्याचे आढळून आले. तसेच आढळलेली कागदपत्रे चुकीची माहिती असलेली आणि कमी किंमतीच्या सामानाची होती. एकूण सामानाची किंमत 26 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. जीएसटी कायदा 2017 च्या 31 आणि 143 कलमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. पुढील चौकशी सुरु आहे.

अशाप्रकारे विमान कंपन्यांच्या कुरीअरद्वारे वस्तू प्रथमच पकडण्यात आल्याची माहिती सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई केंद्रीय आयुक्तालयाचे आयुक्त राजेश सनन यांनी दिली.    

 

 

 

S.Thakur/D.Rane


(Release ID: 1599782) Visitor Counter : 163


Read this release in: English