गृह मंत्रालय

एनडीआरएफचा 15 वा वर्धापन दिन साजरा


एनडीआरएफने 3100 मोहिमांमध्ये एक लाखांहून अधिक लोकांचे प्राण वाचवले- नित्यानंद राय

Posted On: 18 JAN 2020 4:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2020

 

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच एनडीआरएफचा 15 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय कार्यक्रमाचे प्रमुख होते.

एनडीआरएफच्या कामगिरीचे नित्यानंद राय यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एनडीआरएफच्या कामगिरीवर प्रचंड विश्वास आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत आघाडीवर राहून एनडीआरएफ कार्य करते, असे नित्यानंद राय म्हणाले. एनडीआरएफने आपल्या निःस्वार्थी भावनेने केलेल्या कामगिरीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे.

 

एनडीआरएफने स्थापनेपासून आतापर्यंतच्या 15 वर्षांमध्ये 3100 हून अधिक मोहिमांमध्ये एक लाखाहून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. तर, 6.7 लाख लोकांना आपत्तीतून सुखरुप बाहेर काढले आहे.

माननीय पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनूसार एनडीआरएफने राज्यांच्या आपत्ती दलांसमवेत समन्वायाने काम करावे आणि आपत्तीक्षेत्रालगतच्या सर्व स्रोतांची माहिती जमा करावी, असे नित्यानंद राय म्हणाले.  

 

 

S. Thakur/D.Rane



(Release ID: 1599765) Visitor Counter : 112


Read this release in: English