रेल्वे मंत्रालय

अहमदाबाद-मुंबई मार्गावरच्या तेजस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा

Posted On: 17 JAN 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2020

 

अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या या प्रिमियम तेजस गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अहमदाबाद येथे हिरवा झेंडा दाखवला. 19 जानेवारीपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

अहमदाबाद येथून सकाळी 6 वाजून 40 मिनीटांनी सुटणारी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात दुपारी 1 वाजून 10 मिनीटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनीटांनी निघेल आणि अहमदाबाद येथे रात्री 9 वाजून 55 मिनीटांनी पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नादियाड येथे थांबे असतील. गुरुवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. या गाडीला तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ कोटा उपलब्ध राहणार नाही. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आणि ‘आयआरसीटीसी रेल कनेक्ट’ या मोबाईल ॲपवर या गाडीसाठी आरक्षण उपलब्ध होईल. रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर या गाडीचे आरक्षण करता येणार नाही. मात्र आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटमार्फत प्रवाशांना या गाडीचे आरक्षण करता येईल.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1599720) Visitor Counter : 88


Read this release in: English