पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पीसीआरएच्या इंधन संवर्धन महा अभियान सक्षम 2020 ला सुरुवात
Posted On:
16 JAN 2020 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2020
पीसीआरए अर्थात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेतर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या सक्षम या महाअभियानाची सुरुवात आज नवी दिल्ली येथे झाली. इंधन संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी ही मोहीम राबवण्यात येते. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.एम.कुट्टी यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला.
विविध राज्यात ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी एका व्हॅनला हिरवा झेंडाही यावेळी दाखवण्यात आला.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1599607)
Visitor Counter : 144