संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातमध्ये एल ॲण्ड टी शस्त्रास्त्र यंत्रणा संकुलातून 51 व्या के9 वज्र-टी रणगाड्याला दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 16 JAN 2020 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2020

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुजरातमधल्या हझिरा इथल्या लार्सन ॲण्ड टुब्रो शस्त्रास्त्र यंत्रणा संकुलातून 51 व्या के9 वज्र-टी रणगाड्याला हिरवा झेंडा दाखवला.

देशाला शस्त्रास्त्र निर्मितीचे केंद्र आणि निर्यातदार बनवण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असून संरक्षण निर्मितीमध्ये खाजगी क्षेत्राने सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले.

हे संकुल नव भारताच्या नव विचारांचे उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी संकुलाला भेट दिल्यावर केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेने मूर्त रुप घेण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ चे उत्तम उदाहरण के9 वज्र-टी रणगाडे असल्याचे सिंह यांनी सांगितले. या संकुलाच्या माध्यमातून 5000 हून अधिक व्यक्तींना थेट तर 12,500 हून अधिक जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. के9 वज्रच्या 100 ऑर्डर्सपैकी 51 मुदतयादी पूर्ण केल्याबद्दलही संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.

जागतिक स्पर्धात्मक निविदेच्या माध्यमातून एल ॲण्ड टी डिफेन्सने के9 वज्र-टी साठी संरक्षण मंत्रालयाचे कंत्राट मिळवले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 


(Release ID: 1599606) Visitor Counter : 163
Read this release in: English