पंतप्रधान कार्यालय

डॉ. जरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

Posted On: 15 JAN 2020 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2020

 

इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जव्वाद जरीफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रायसीना संवादात भाग घेण्यासाठी डॉ. जरीफ भारत दौऱ्यावर आले आहेत.

डॉ. जरीफ यांचे भारतात स्वागत करतानाच, न्यूयॉर्क येथे सप्टेंबर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इराणचे राष्ट्रपती रुहानी यांच्यासोबत झालेल्या मैत्रीपूर्ण चर्चेच्या आठवणींना उजाळा दिला. इराणबरोबर अधिक दृढ आणि मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याच्या प्रतिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. चाबहार प्रकल्पातील प्रगतीसाठी पंतप्रधानांनी इराणी नेतृत्वाचे आभार मानले.

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी परिसरात अलिकडेच झालेल्या घटनांबद्दल आपले विचार मांडले. या क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य राहिले पाहिजे ही भारताची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 



(Release ID: 1599540) Visitor Counter : 71


Read this release in: English