रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठीचे नॅशनल हायवे एक्सलंस ॲवार्ड गडकरी यांच्या हस्ते प्रदान
Posted On:
15 JAN 2020 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2020
देशात जागतिक दर्जाची रस्ते पायाभूत संरचना उभारण्यात राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रातल्या सर्व संबंधितांच्या योगदानाची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशंसा केली आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून गेल्यावर्षी प्रतिदिन विक्रमी 29 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करण्यात आली. येत्या काळात हा विक्रम पार करून दरदिवशी 50 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची उभारणी करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रात अद्वितीय कामगिरीसाठीचे एक्सलंस ॲवार्ड प्रदान करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते.
2018 मध्ये नॅशनल हायवे एक्सलंस ॲवार्ड सुरू करण्यात आले. देशात महामार्ग पायाभूत संरचना विकासासाठीच्या सर्व संबंधितांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1599483)
Visitor Counter : 98