महिला आणि बालविकास मंत्रालय
दत्तक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सर्व संबंधितांनी सुधारणा करावी-स्मृती झुबीन इराणी
Posted On:
14 JAN 2020 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2020
दत्तक कायदा केवळ मुलांना घरी आणण्यापुरता मर्यादित नाही. तर मुलाचे सर्व हक्क आणि अधिकार सुरक्षित करण्याची आणि दत्तक पालकांकडे त्याची जबाबदारी हस्तांतरीत करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, असे महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने ‘दत्तक’ विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात त्या आज बोलत होत्या.
मुलांचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी दत्तक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सुधारणा करावी, असे इराणी यांनी सांगितले. मुलांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रतिक्षायादी मोठी आहे. तरीही देशातील अनाथालये आणि आश्रयगृहात राहणाऱ्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष दत्तक संख्या कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते. चर्चासत्रात दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ करणे, मोठ्या आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे पुनर्वसन, दत्तक प्रक्रियेत शासकीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली.
M.Chopade/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1599371)