वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डिसेंबर 2019चा घाऊक किंमत निर्देशांक

Posted On: 14 JAN 2020 6:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2020

 

सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात डिसेंबर 2019 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के वाढ होऊन तो 122.3 वरून 122.8 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.

चलनफुगवटा

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर डिसेंबर 2019 मध्ये 2.59 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 0.58 टक्के(तात्पुरती आकडेवारी)  आणि डिसेंबर 2018 मध्ये तो 3.46 टक्के होता.

प्राथमिक वस्तू

या गटाच्या निर्देशांकात 1 टक्क्याने वाढ होऊन तो 148.8 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 147.3 होता.

अन्न घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.1 टक्क्याने वाढ होऊन तो 162.5 झाला. विड्याची पाने (13 टक्के), उडीद (9 टक्के), अंडी आणि मटण (प्रत्येकी 5 टक्के), बाजरी आणि ज्वारी (प्रत्येकी 3 टक्के), मूग, मसूर आणि मका (प्रत्येकी 2 टक्के) यांच्या किमतीत वाढ झाली. तर मटार/चवळी (11 टक्के), नाचणी, खारे मासे (3 टक्के), कॉफी, बीफ (2 टक्के), चहा, राजमा, गोडे मासे, फळे आणि भाज्या (1 टक्के) यांच्या किमतीत घट झाली.

‘खाद्येतर’ घटकाच्या निर्देशांकात 5.5 टक्के वाढ होऊन तो 127 वरून 134 झाला.

‘खनिजे’ घटकाच्या निर्देशांक 0.8 टक्के घट होऊन तो 154.8 वरून 153.6 झाला.

‘कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस’ घटकाच्या निर्देशांकात 3.5 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 83.1 वरून 86 झाला.

इंधन आणि वीज

या गटाच्या निर्देशांकात कोणताही बदल न होता तो 101.3 राहिला.

उत्पादित वस्तू

या गटाच्या निर्देशांकात 0.2 टक्के वाढ होऊन ते 117.8 वरुन 118 झाला.

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांक

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर वाढून डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के झाला. नोव्हेंबर 2019 मध्ये तो 9.02 टक्के होता.

 

M.Chopade/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1599365) Visitor Counter : 155


Read this release in: English