रेल्वे मंत्रालय

ई-कार्यालय दुसऱ्या टप्प्यासाठी भारतीय रेल्वेचा रेलटेलसोबत सामंजस्य करार

Posted On: 13 JAN 2020 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2020

 

भारतीय रेल्वेच्या 58 एककांमधील 50,000 वापरकर्त्यांसाठी एनआयसी ई-कार्यालये सुरु करण्याच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी भारतीय रेल्वेने रेलटेलसोबत करार केला आहे. दुसऱ्या टप्प्यात 34 हून अधिक रेल्वे विभागांमधील 39,000 वापरकर्त्यांची 30 जून 2020 पर्यंत एनआयसी ई- कार्यालय मंचावर नोंदणी करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातले काम पूर्ण करण्याची मुदत मार्च 2020 होती. मात्र रेल्वे मंत्रालयातील मिनिरत्‍न दर्जाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेलने हे काम मुदतीआधीच पूर्ण केले आहे.

सध्या फाइल मॅनेजमेंट सिस्टिम, नॉलेज मॅनेजमेंट सिस्टिम, कोलॅबोरेशन ॲण्ड मेसेजिंग सर्विसेस आणि पर्सोनेल इन्फोर्मेशन मॅनेजमेंट सिस्टिम हे अमलात येणाऱ्या ई-कार्यालय प्रणालीचे भाग आहेत.

ई-कार्यालयामुळे कागदरहित कामकाज संस्कृतीला चालना मिळणार असून कार्बन उत्सर्जन कमी होण्यास साहाय्य मिळणार आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1599244) अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein: English