पंतप्रधान कार्यालय

सय्यद अल सैद यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 12 JAN 2020 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2020

 

ओमानचे सुलतान झाल्याबद्दल सय्यद हैथम बिन तारिक अल सैद यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

ओमानचे सुलतान झाल्याबद्दल सय्यद हैथम बिन तारिक अल सैद यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली ओमानची प्रगती सुरु राहील, ओमानची समृद्धी आणि जागतिक शांतीसाठीचे योगदान वृद्धिंगत होईल, असा मला विश्वास आहे.

भारताचे ओमानसोबत प्राचीन संबंध आहेत. आमच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सय्यद हैथम यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1599234) Visitor Counter : 67


Read this release in: English