पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित

Posted On: 11 JAN 2020 10:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातामधील चार पुनर्विकसित इमारती राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये ओल्ड करंसी इमारत, बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकाफ हाउस यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले कि आजचा दिवस विशेष आहे कारण आज भारताच्या कला, संस्कृती आणि वर्षाचे संवर्धन करणारे आणि या वारसा स्थळांचे महत्व नव्याने समजून घेऊन त्याला नवी ओळख देण्याचे आणि नव्या रूपात समोर आणण्याचे राष्ट्रव्यापी अभियान सुरु होत आहे.

जगासाठी वारसा पर्यटनाचे केंद्र

भारताला नेहमीच आपल्या सांस्कृतिक वारसा आणि स्थळांचे संरक्षण आणि आधुनिकीकरण करायची इच्छा होती असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याच भावनेने केंद्र सरकारने जगात भारताला वारसा पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना हाती घेतली.

देशातील पाच ऐतिहासिक संग्रहालयांचे आंतरराष्ट्रीय मानके विचारात घेऊन आधुनिकीकरण केले जाईल असे ते म्हणाले.  हे काम जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक असलेल्या कोलकातातील भारतीय संग्रहालयापासून सुरु करण्यात येत आहे. या कामासाठी निधी जमवण्यासाठी, या महत्वाच्या सांस्कृतिक  वारसा केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार भारतीय वारसा संवर्धन संस्था स्थापन करण्याचा विचार करत आहे ज्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, ओल्ड करेंसी इमारत , बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकॉफ हाउस यासारख्या कोलकाताच्या चार ऐतिहासिक इमारतींच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये बेलवेडियर हाउसला  एक जागतिक दर्जाचे संग्रहालय बनवण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या कोलकातामधील नाणी  बनवणाऱ्या कारखान्यात नाणी संग्रहालय उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे मोदी म्हणाले.

विप्लवी भारत

पंतप्रधान म्हणाले की, विक्टोरिया मेमोरियलच्या पाच पैकी  तीन कलादालने गेली अनेक वर्षे बंद आहेत. आणि ही चांगली गोष्ट नाही. ती पुन्हा सुरु करण्याचा आमचा विचार आहे . यापैकी काही जागा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान दाखवण्यासाठी उपलब्ध केली जावी अशी माझी विनंती आहे. इथे आपण सुभाष चंद्र बोस, अरबिंदो घोष, रास बिहारी बोस यांच्यासारखे महान नेते आणि खुदी राम बोस,बाघा जतिन ,बिनय, बादल आणि दिनेश यांच्यासारख्या क्रांतिकारकांची माहिती देऊ शकतो आणि याला विप्लवी भारत असे नाव द्यायचे.

सुभाषचंद्र बोस यांच्याप्रति गेल्या अनेक दशकांपासूनच्या भावना लक्षात घेऊन दिल्लीतील लाल किल्ल्यात तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवरसंग्रहालय उभारण्यात आल्याचे  त्यांनी सांगितले.

बंगालच्या प्रतिष्ठित नेत्यांना  आदरांजली

पश्चिम बंगालच्या मातीत जन्मलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेल्या महान नेत्यांना नव्या युगात योग्य आदरांजली दिली जावी असे पंतप्रधान म्हणाले.

आता आपण  श्री ईश्वर चंद्र विद्यासागर यांची 200 वी जयंती साजरी करत आहोत आणि भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे 2022 मध्ये साजरी करत असताना  प्रसिद्ध समाज सुधारक आणि  शिक्षण तज्ज्ञ राजा मोहन राय यांचीही 250 वी  जयंती आहे. देशाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, युवक, महिला आणि मुलीच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रयत्न्नांचे स्मरण आपण करायला हवे . याच भावनेने त्यांची 250 वी जयंती देखील साजरी करायला हवी असे पंतप्रधान म्हणाले.

भारतीय इतिहासाचे संवर्धन

भारतीय परंपरा, भारताचे महान नेते, भारताचा इतिहास यांचे संवर्धन करणे हे राष्ट्रनिर्मितीच्या प्रमुख बाबींपैकी एक बाब आहे असे पंतप्रधान म्हणाले.

ब्रिटिश राजवटीदरम्यान लिहिण्यात आलेल्या भारताच्या इतिहासातून अनेक महत्वपूर्ण बाबी वगळण्यात आल्या आहेत ही दुःखद गोष्ट आहे . 1903 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही ओळी मी सांगू इच्छितो. भारताचा इतिहास तो नाही जो आपण अभ्यास केला आणि परीक्षेत लिहिला. यात केवळ एवढेच सांगण्यात आले आहे कि बाहेरच्या लोकांनी कशा प्रकारे आपल्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मुलांनी कशा प्रकारे आपल्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, आणि भावंडे कशा प्रकारे सिंहासनासाठी लढली. अशा प्रकारच्या इतिहासातून भारतीय नागरिक, कसे राहायचे याबद्दल माहिती नाही.

गुरुदेव असेही म्हणाले, वादळाची ताकद कुठलीही असो, लोकांनी त्याचा कशा प्रकारे सामना केला हे जास्त महत्वाचे आहे.

मित्रानो, गुरुदेव यांचे हे विचार त्या  इतिहासकारानीं केवळ बाहेरून वादळ पाहिले याचे स्मरण करून देतात. ज्यांनी या वादळाला झेलले त्यांच्या घरात ते गेलेले नाहीत , जे बाहेरून पाहतात त्यांना लोक कसा सामना करत आहेत हे समजत नाही.

देशातील असे अनेक मुद्दे या  इतिहासकारानी मागे ठेवले आहेत.

अस्थिरता आणि युद्धाच्या त्या काळात ज्यांनी देशाचा विवेक जपला,ज्यांनी आपल्या महान परंपरा पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम केले.

हे काम आपली कला,आपले साहित्य, आपले  संगीत, आपले संत , आपले भिक्षु यांनी केले.

भारतीय परंपरा आणि संस्कृतीला प्रोत्साहन

भारताच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या कला आणि संगीत याच्याशी संबंधित विशेष परंपरा आपल्याला आढळतात. त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बुद्धिजीवि आणि संतांचा प्रभाव देखील पाहायला मिळतो. त्या व्यक्ती, त्यांचे विचार, कला आणि  साहित्य यांचे वेगळे स्वरूप, यांनी इतिहासाला समृद्ध केले आहे.  या महान व्यक्तींनी भारताच्या इतिहासात काही सर्वात मोठ्या सामाजिक सुधारणांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही अनुकरणीय आहे.

भक्ति आंदोलन काही समाज सुधारकांची गाणी आणि विचारांनी समृद्ध केले. संत कबीर, तुलसीदास आणि अन्य अनेकांनी समाजाला जागरूक करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.

आपण लक्षात ठेवायला हवे कि  स्वामी विवेकानंद मिशिगन विद्यापीठात संवाद साधताना म्हणाले होते की, ‘सध्याचे शतक तुमचे असू शकते. मात्र 21 वे शतक भारताचे असेल.’ त्यांचे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण कठोर मेहनत करत राहायला हवी.

 

D.Wankhede/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1599211) Visitor Counter : 180


Read this release in: English