ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2019 प्रसिद्ध केला

Posted On: 10 JAN 2020 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2020

 

केंद्रीय ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, कौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राजकुमार सिंह यांनी आज नवी दिल्लीत राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2019 प्रसिद्ध केला. 97 महत्वपूर्ण संकेताच्या आधारे तो 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता उपक्रमांना पाठपुरावा करतो. यामुळे राज्यांना ऊर्जा सुरक्षा आणि हवामानाशी संबंधित उदिृष्ट साध्य करण्यात मदत करेल.

या निर्देशांकानुसार बहुतांश राज्यांनी धोरणे आणि विनियमनाशी संबंधी उपक्रम हाती घेतल्याचे आढळते.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar


(Release ID: 1599079) अभ्यागत कक्ष : 218
Read this releasein: English